‘महापरीक्षा पोर्टल’ काय संपायचं नाव घेईना…!

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । मुख्यमंत्री ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षांना स्थगिती देण्यात आली.  मात्र पोर्टलवर अर्ज नोंदणीसह उत्तरतालिका जाहीर होणे अजून सुरूच आहे. परीक्षेच्या जाहिरातीनंतर वर्ष उलटत आले असले, तरी भरतीच्या परीक्षा न झाल्याने उमेदवारांची विवंचना कायम आहे. हे महापरीक्षा पोर्टल बंद होण्यासाठी उमेदवारांनी आंदोलन पुकारले असले, तरी त्यातील तेढ दूर होत नसल्याने ‘महापरीक्षा पोर्टल ’ काय संपायचं नाव घेईना असा संताप उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान विविध पदांच्या भरतीसाठी ‘महापरीक्षा’ पोर्टलद्वारे अर्ज नोंदणी सुरू होती. भरती दरम्यान होणारा गोंधळ, अपारदर्शकता, सदोष निकालांमुळे उमेदवारांनी त्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. तलाठी, पशुसंवर्धन, जलसंपदा, पोलिस, वनरक्षक या सर्वच भरतीत महापरीक्षा पोर्टलचा त्रास उमेदवारांना सहन करावा लागला. तलाठी भरतीत प्रश्नपत्रिकाच सदोष असल्याचा दावा झाला, तर पशुसंवर्धनच्या परीक्षेला अडीच महिने उलटल्यानंतर मुहूर्त सापडला होता. या तक्रारींची दखल घेत पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत सर्व परीक्षा स्थगित करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

सरकारी विभागातीकाही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी देखील विधानसभेत महापरीक्षेला विरोध केला. त्यामुळे उमेदवारांमध्ये सकारात्मकता असली, तरी परीक्षा नेमक्या कशा होणार यासह पोलिस भरतीसाठीचे अर्ज मात्र महापरीक्षेवरच स्विकारले जात असल्याने, ही भरती होईल की, रद्द केली जाईल, याबाबत साशंकता कायम आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या लिपिक पदाच्या भरतीची उत्तरतालिका स्थगितीनंतर पोर्टलवर जाहीर झाल्याने उमेदवारांचा गोंधळ आणखीन वाढला आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करण्यापेक्षा हे पोर्टल थेट बंदच करा, अशी मागणी उमेदवार करत आहेत. त्याबाबत उमेदवारांना स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली जात  आहे.

_—-__

हे पण वाचा -
1 of 352

अधिक माहितीसाठी – http://www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: