‘महापरीक्षा पोर्टल’ बंदसाठी तातडीने निर्णय घेण्यात येईल – खा. सुप्रिया सुळे

करीअरनामा । महाविकासआघाडीच्या सरकारने नुकताच महाराष्ट्राचा कारभार हाती घेतला आहे. यामध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यात सरकार आल्यावर ‘महापरीक्षा पोर्टल’ लगेच बंद करू असे स्पष्ट केले होते.

त्यालाच दुजोरा म्हणून काल राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. त्या म्हणतात, ” स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारे महापोर्टल तातडीने बंद करण्याचा शब्द या विद्यार्थ्यांना दिला होता. स्पर्धा परीक्षांची भरती यामुळे जुन्या पद्धतीने घेता येईल. मा.मुख्यमंत्री उद्ववजी ठाकरे आपण कृपया,यावर तातडीने निर्णय घ्यावा ही विनंती.”

त्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारी करणारे व महापरीक्षा पोर्टलच्या कारभारावर असमाधानी असणाऱ्या परिक्षार्थींना यांने सुखद धक्का बसला आहे.