MAH BEd CET परीक्षांचे निकाल लवकरच होणार जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरील अपडेटनुसार, हे निकाल ९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार होते. मात्र, सीईटी कक्षाने अद्याप निकालाच्या बाबतीत कोणतीही अधिकृत सूचना उपलब्ध केलेली नाही.

निकाल जाहीर होताच  उमेदवारांचे काऊन्सेलिंग सुरू होईल. या समुपदेशन फेरीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिले जातील. बीएड कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच बीएड सीईटी आणि बीएड इएलसीटी २०२० या परीक्षा २१, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० रोजी झाल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

बीएड सीईटीसाठी प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये होती. बीएड इएलसीटीसाठी केवळ इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका होती. बीएड सीईटीसाठी एकूण १०० प्रश्नांसाठी ९० मिनिटांचा कालावधी होता. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नव्हते. तर बीएड इएलसीटीसाठी एकून ५० प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक योग्य उत्तराला १ गुण होता. रीडिंग कॉम्प्रिहेंशन, ग्रामर, फोनेटिक्स, फिगर्स ऑफ स्पीच, सेंटेंस फॉर्मेशन आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

असा पहता येईल निकाल –

निकाल जारी झाल्यानंतर उमेदवार सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर जा. – होमपेजवर MAH BEd CET 2020 Result या लिंकवर क्लिक करा.

आता एक नवं पेज उघडेल. येथे उमेदवारांनी आपले क्रिडेन्शिअल भरा आणि सबमिट करा.

आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटही काढून ठेव शकता.

अधिकृत वेबसाईट – mahacet.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com