नोकरीच्या शोधात आहात? डिग्रीविना सरकार देतंय नोकरी; Drone Pilot व्हा आणि 30 हजार कमवा!

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकार कमाईची संधी देणार आहे. (Drone Pilots Recruitment 2022) विशेष म्हणजे यासाठी कॉलेजच्या डिग्रीची आवश्यकता नाही. पुढील काही वर्षांत देशात जवळपास 1 लाखाहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत ड्रोन पायलट्सची बंपर भरती होण्याची शक्यता आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्लीत निती आयोगाच्या Experience Studioचं लॉन्चिंग केलं. त्यावेळी त्यांनी Drone Pilots च्या भरतीची घोषणा केली. 2030 पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब बनवण्याचं लक्ष्य आहे. तसेच औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं.

Drone Pilots होण्यासाठी आवश्यक पात्रता – (Drone Pilots Recruitment 2022) 

हे पण वाचा -
1 of 13
  • 12 वी उत्तीर्ण झालेल्या व्यक्ती ड्रोन पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकतात.त्यासाठी कॉलेजच्या डिग्रीची गरज नाही.
  • येणाऱ्या काही वर्षांत देशाला 1 लाख ड्रोन पायलट्सची आवश्कयता भासेल.
  • इच्छुकांना दोन ते तीन महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल.
  • ड्रोन पायलटला 30 हजार रुपये मासिक पगार मिळेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com