Leave Policy of Meesho : आनंदी आनंद !! ‘ही’ कंपनी जॉईन केली तर मिळेल 365 दिवस सुट्टी!! चिंता नको.. तुम्हाला सुट्टीचा पगारही मिळणार

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या नोकरदार वर्गाला कामाचे दिवस आणि सु्ट्टी यांची सांगड घालणं (Leave Policy of Meesho) अवघड होत चाललं आहे. काही बॉस असे असतात, की त्यांच्यासमोर कामगाराला एका दिवसाची सुट्टी मागण्यासाठी जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुट्टीसाठी वारंवार बॉसला विनंती करावी लागते. एवढं करूनही आपल्याला हवं तेव्हा सुट्टी मिळेल, याची खात्री नसते. या परिस्थितीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. यामध्ये मनुष्यबळाचा तुटवडा, वर्चस्व गाजवणारा बॉस, सुट्टी घेतल्यानंतर होणारी पगार कपात अशी अनेक कारणं आहेत. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक कंपनी कामगारांना चक्क 365 दिवस पगारी रजा देते. हे शक्य आहे का? असा प्रश्न कोणालाही पडेल; पण हे शतप्रतिशत खरं आहे.

वर्षभर मिळणार पगारी रजा – (Leave Policy of Meesho)

ऑनलाईन मार्केटमधील आघाडीच्या मिशो कंपनीनं आपल्या धोरणांमध्ये बदल करून कर्मचाऱ्यांना भरपूर पगारी रजा देण्याचं नियोजन केलं आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक-दोन नाही, तर 365 दिवस पगारी रजा ऑफर करते. मिशो कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्षभर पगारी रजा देण्याचं धोरण जाहीर केलं आहे.

Mee care Policy –

मिशो कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘मी केअर’ (Mee care) नावाचं एक नवं धोरण लॉंच केलं आहे. त्यानुसार कर्मचारी एक वर्ष म्हणजेच 365 दिवस पगारी रजेचा लाभ घेऊ शकतात. यात कर्मचाऱ्यानं स्वतःच्या (Leave Policy of Meesho) आजारपणासाठी सु्ट्टी घेतली, तर कंपनी त्याला पूर्ण पगार देणार आहे. कर्मचाऱ्यानं कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या आजारपणासाठी सुट्टी घेतली, तर त्याला तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 25 टक्के पगार कंपनीकडून दिला जाणार आहे.

लिव पॉलिसीमधील अटी –

यासह कर्मचाऱ्याला सुट्टीच्या कालावधीत पीएफ, विमा यांसारख्या सुविधा दिल्या जातील. आजारपण किंवा उपचाराव्यतिरिक्त अन्य कारणासाठी सुट्टी घेतली, तर संबंधित कर्मचाऱ्याला कोणताही पगार दिला जाणार नाही. पण कर्मचारी वैद्यकीय कारणासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी अशा प्रकारे सुट्टी घेऊ शकणार आहेत. `इकॉनॉमिक टाइम्स`च्या वृत्तानुसार, कर्मचारी त्यांची आवड जोपासण्यासाठी देखील वेळ काढू शकणार आहेत. (Leave Policy of Meesho)

मिशोचे सीआरओ आशिष कुमार सिंग यांच्या हवाल्यानं एका दैनिकानं म्हटलं आहे, की मोठ्या प्रमाणावर कर्मचारी या धोरणाचा लाभ घेतील अशी अपेक्षा कंपनीला नाही. त्याच वेळी पगारी रजा घेणारा कर्मचारी अप्रैझल सायकल अर्थात मूल्यांकन चक्रात सहभागी होऊ शकेल. रजेवरून परतल्यावर संबंधित कर्मचारी ज्या पदावर होता, त्याच पदावर पुन्हा काम करू शकेल. मिशो कंपनीच्या या अनोख्या धोरणाचा कर्मचारी वर्गाला किती फायदा होईल, किती कर्मचारी या धोरणाचा लाभ घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com