जाणून घ्या ; कशी कराल IAS ची तयारी ?

करिअरनामा ।भारतीय नागरी सेवेंतर्गत भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते. ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. भारतात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेंतर्गत केवळ तीन पदांची भरती होते ज्यात IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नोकरी आणि करिअर विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”

नागरी सेवा परीक्षेत (यूपीएससी) टॉप रँकने यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची निवड आयएएस अधिकारी पदासाठी होते. या परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी असते.

अशी करा IAS ची तयारी !

यूपीएससी परीक्षा देण्यासाठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे आहे. उमेदवार जास्तीत जास्त 6 वेळा ही परीक्षा देऊ शकतो.

>दहावीनंतरच या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. यूपीएससीच्या तयारीसाठी अनेक खासगी तसेच शासकीय संस्थाही कार्यरत आहेत.
> दररोजचे वर्तमानपत्र आणि नियतकालिक वाचणं अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते.

> दहावीनंतर असा विषय निवडा, ज्यात तुम्हाला रस आहे आणि हाच विषय तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी निवडू शकाल. पसंतीचा विषय आधीच ठरल्याने तुम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

> यूपीएससी परीक्षेत एकूण 25 विषयांमधून आपल्याला विषय निवडायचा असतो. तोच विषय निवडा, जो तुम्हाला अभ्यासायला सोपा जाईल.

वेळेचे योग्य नियोजन करा. एक रुटीन तयार करा आणि त्याप्रमाणे तयारी करा. अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका.