वयाच्या २३ वर्षी बनली आयएएस ऑफिसर, परिक्षेच्या दिवशी होता १०३° इतका ताप

प्रेरणादायी । सौम्या शर्मा आज भारतीय आयएएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी सौम्या यांनी यु.पी.एस.सी. परिक्षा उत्तीर्ण केली आहे. २०१७ साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नंतर एनएलयूकडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांचा आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.

सौम्याच्या म्हणण्यानुसार त्या यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोणत्याही कोचिंगमध्ये सामील झाल्या नव्हत्या. सोम्या यांनी सर्व अभ्यास स्वत:च घरी केला. पूर्वपरिक्षेला चार महिणे असताना त्यांनी युपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुख्य परीक्षेच्या एक आठवड्यापूर्वीच सोम्या यांना ताप आला. मात्र अशातही त्यांनी माघार घेतली नाही.

माध्यमांच्या वृत्तानुसार, सौम्या सांगते की, माझा ताप संपूर्ण आठवडाभर खाली आला नव्हता. परीक्षेच्या दिवशीही तापमान १०२ च्या खाली जात नव्हते. कधीकधी ते १०३ अंशांवर पोहोचत होते. मात्र तरीही सोम्या यांनी जोरदार लढत देत युपीएससी उत्तीर्ण केली.

अधिक माहितीसाठीwww.careernama.com

नोकरी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78218 00959 या संपर्क क्रमांकाला WhatsApp करा आणि लिहा “HelloJOB”.