अभिमानास्पद ! दररोज ८ तास नोकरी करून कंडक्टरने केला कलेक्टर होण्याच्या दिशेने प्रवास

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।  झोपल्यानंतर पडणारी ती स्वप्नं नाहीत. तर तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्नं असतात. त्यातच शिकण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश तुमच्यापासून दूर नसते. असच प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एका तरुणाने बस कंडक्टरची नोकरी पत्करली. ही नोकरी करत असतानाच त्याने दररोज पाच तास अभ्यास केला आणि आता लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आता त्याच्या मुलाखतीसाठी अवघे २ महिने राहिले आहेत. मुलाखतीचा हा शेवटचा स्टॉप पार केल्यानंतर तो आयएएस किंवा आयपीएस होईल. खरंतर हा प्रवास स्वप्नवत वाटत असला तरी तो खडतर असाच होता.

कंडक्टर म्हणून काम करणारा कर्नाटकातील बेंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनमध्ये असणारा मधु युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. परीक्षेचा निकाल पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण त्याला आयएएस होण्याच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.

हे पण वाचा -
1 of 224

मधु सध्या 29 वर्षांचा आहे. गेल्या वर्षी त्याने जूनमध्ये पूर्व परीक्षा दिली होती. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तो मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरला होता. आता त्याने मुख्य परीक्षाही उत्तीर्ण केली असून 25 मार्चला मुलाखत होणार आहे. त्याला आशा आहे की आयएएस होण्याचं त्याचं स्वप्न सत्यात उतरेल. या तरुणाची ही कहाणी आणि जिद्द खरंच अभिमानास्पद आहे.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: