‘मुलगी शिकली प्रगती झाली!’ कराडच्या प्रगती शर्माला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले तब्बल 25 लाखांचे पॅकेज

कराड । कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटी शाखेच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीला नामांकीत कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज मिळाले आहे. (Government Engineering College) प्रगती शर्मा या विद्यार्थिनीने आपल्या नावाप्रमाणे प्रगती करत मिळवलेले 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज सर्वत्र कौतुकाचा विषय बनत आहे. तिच्या या यशाने कराडकरांची मान उंचावली आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीच्या दैदीप्यमान कामगिरीने कराडच्या लौकिकात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेलाय.

दरम्यान, 1959 साली स्थापन झालेल्या कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात यंदा हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. त्यावेळी नामांकीत कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले. या कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल 185 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. त्यात सर्वोच्च 25 लाखांच्या पॅकेजची ऑफर आयटी शाखेच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीला मिळली. (Karad Pragati Sharma Gets Rs 25 Lakh Job Package)

कोरोना काळात नोकऱ्यांची स्थिती बिकट असतानाच कराडच्या शासकीय (Government Engineering College) अभियांत्रिकी महाविद्यालय त्याला अपवाद आहे. महाविद्यालयात प्लेसमेंटच्या डिसेंबरअखेर 185 वर ऑफर्स पोहोचल्या आहेत. त्यात टीसीएस, कॅपजेमनी, कॉग्निझंट नामांकीत कंपन्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वोच्च 25 लाखांच्या पॅकेजचा मान महाविद्यालयाच्या प्रगती शर्माने पटकावला.

25 लाखांचे पॅकेज मिळल्यानंतर प्रगती शर्मा हिने आनंद व्यक्त करत म्हणाली कि, ”मी कराडच्या कॉलेजला रडून रडून आले होते, मला मेडिकलला जायचं होतं, परंतु इंजिनीअरिंगला ऍडमिशन मिळाल्यानंतर मला भीती वाटत होती. मात्र येथील शिक्षकांच्या शिकवणीमुळे माझा इंजिनीअरिंगमधील इंटरेस्ट वाढला. आता मिळालेल्या यशाने मला आनंद झाला”

मुलीने मिळवलेल्या यशाचा अभिमान असून, तिच्या यशात तिची आई, भाऊ तसेच कराड इंजिनीअरिंग कॉलेजच्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. आम्ही कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन घेतल्यानंतर सोडून येताना फार दुःख झालं होतं, मात्र कराड इंजिनीअरिंग कॉलेजच्या शिक्षकांनी आता ही आमची मुलगी आहे, तिची काळजी करू नका, असा विश्वास दिला होता, अशी माहिती प्रगती शर्माच्या वडिलांनी दिली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com