Journalist Fellowship : पत्रकारांसाठी खुषखबर!! Oxford युनिव्हर्सिटीने जाहीर केली ‘जर्नालिस्ट फेलोशिप’; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारिता हा भारताच्या लोकशाहीचा (Journalist Fellowship) चौथा आधारस्तंभ आहे. देशातील तरुण-तरुणी महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकार होण्याचं स्वप्न बघतात. अनेक तरुण ग्रॅज्युएशन नंतर या क्षेत्राकडे वळलेले आपण पाहतो. काही पत्रकार दीर्घ अनुभव घेतल्यानंतर सुद्धा थांबत नाहीत आणि शिक्षण पुढे सुरुच ठेवतात. जर तुम्हीही पत्रकार असाल आणि तुम्हाला थेट परदेशात जाऊन पत्रकारितेचं शिक्षण घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा एका फेलोशिपबद्दल सांगणार आहोत; ज्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण जगात पत्रकार म्हणून नावलौकिक मिळवू शकता.
पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतिष्ठित मानली जाणारी ‘रॉयटर्स-ऑक्सफर्ड जर्नालिस्ट फेलोशिप’बद्दल आम्ही बोलत आहोत. ही फेलोशिप रॉयटर्स इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी डिझाईन केली आहे. जगभरातील पत्रकारांसाठी ही फेलोशिप आहे. जे पत्रकार वरिष्ठ आहेत किंवा (Journalist Fellowship) ज्यांना पत्रकारितेत येऊन काही वर्षांचा अनुभव आहे अशा सर्व पत्रकारांना ही फेलोशिप दिली जाते. पण यासाठी नक्की कोण पात्र असतात? आणि या फेलोशिपमध्ये नक्की किती मानधन दिलं जातं? हे जाणून घेऊया.

फेलोशिपची वैशिष्ट्ये (Journalist Fellowship)
‘रॉयटर्स-ऑक्सफर्ड जर्नालिस्ट फेलोशिप’ साठी जगभरातील केवळ 30 पत्रकारांना संधी देण्यात येते. निरनिराळ्या देशांमधून आलेल्या पत्रकारांना या फेलोशिपमध्ये आपले अनुभव आणि कल्पना एकमेकांसोबत शेअर करण्याची संधी मिळते. तसंच पत्रकारितेतील चॅलेन्जेस एकमेकांसमोर मांडता येतात. इतकंच नाही तर तुम्हाला प्रसिद्ध अशा काही मोठ्या न्यूज फर्म्सला भेट देण्याची संधीही मिळते.
फेलोशिप फंडेड असते का?
कार्यक्रमातील बहुतेक पत्रकारांना पूर्णपणे निधी दिला जातो. या माध्यमातून यशस्वी अर्जदारांची फी कव्हर केली जाते आणि त्यांना £2,000 चा मासिक स्टायपेंड मिळतो. यामधून तुम्ही निवास, भोजन आणि सामान्य राहणीमानाचा खर्च पूर्ण करू शकता.

काय आहे पात्रता?
1. या फेलोशिपसाठी, तुमच्याकडे किमान पाच वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असणं आवश्यक आहे.
2. किंवा क्वचित प्रसंगी समतुल्य कौशल्याचे प्रदर्शन केले पाहिजे. (Journalist Fellowship)
3. सार्वजनिक व्यवहार, जनसंपर्क किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन्समध्ये काम करणारे यासाठी पात्र नसतात.
4. इंग्रजी भाषेच्या प्रवीणतेची चाचणी घेतली जात नाही, परंतु तुम्ही इंग्रजीमध्ये समजून घेण्यास आणि चर्चेत सामील होण्यास सक्षम असणं आवश्यक आहे.
फेलोशिपसाठी इथे करा अर्ज – https://reutersinstitute.politics.ox.ac.uk/how-apply-our-fellowship-programme
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com