गृहमंत्र्यांकडून स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना दिलासा, राज्यात लवकरच ८ हजार पदांसाठी पोलीस भरती

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडीच्या गृहविभागाने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे . राज्यात सात ते आठ हजार रिक्त पदांसाठी पोलीस भरती करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .

देशभरातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागण्यापैकी बेरोजगारी ही एक मागणी आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे असं देशमुख यावेळी म्हणाले. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असून विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं.

हे पण वाचा -
1 of 210

राज्यातील महिला अत्याचार, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत देशमुख यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहनही त्यांनी केले.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

%d bloggers like this: