Job Notification : पनवेल महानगरपालिकेत फार्मासिस्ट पदांवर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (Job Notification) अंतर्गत, पनवेल महानगरपालिकेत फार्मासिस्ट पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पनवेल
भरले जाणारे पद – फार्मासिस्ट
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023
E-Mail – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल, पिन – 41006

नोकरी करण्याचे ठिकाण – पनवेल
वय मर्यादा – 65 वर्षे
अर्ज फी – (Job Notification)
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/-
भरतीचा तपशील –

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12th+ Diploma (D.Pharm/B.Pharm)
मिळणारे वेतन – रु. 17,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. पुर्ण माहिती भरलेला फॉर्म
2. वयाचा पुरावा (Job Notification)
3. पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
4. गुणपत्रिका
5. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
6. शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
7. आधारकार्ड
8. सध्याचा फोटो
9. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
10. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
11. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
12. Domicile Certificate (Job Notification)
13. राष्ट्रीयकृत बँकेचा Demand Draft
अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.

निवड प्रक्रिया – (Job Notification)
1. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा–या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार / गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकार मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
2. उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या (Job Notification) मार्गदर्शक सुचनांनुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि.१७/०३/२०२२ रोजीच्या पत्रानुसार निकष लावून १:३ व १:५ उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी/ पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण. अतिरिक्त अर्हता, अनुभव विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.

Panvel Mahanagarpalika Jobs 2023काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज नमुन्यासाठी येथे CLICK करा – Form
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com