Job News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार; शिक्षण मंत्री केसरकरांची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन | राज्यात लवकरच 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती केली जाईल अशी घोषणा (Job News) शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असेल, केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्षपणे ही पदं भरायची आहेत; अशी माहिती केसरकरांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केवळ घोषणा न करता आपल्याला ही पदे भरायची आहेत याबाबत सविस्तर चर्चा कॅबिनेट बैठकीत झाली आहे असं केसरकर यांनी सांगितलं आहे. खास करून बेरोजगार युवकांना नोकरीची (Job News) संधी मिळाली पाहिजे. खूप दिवसांनी शिक्षक भरती होत असल्याने जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ही भरती म्हणजे आशेचा किरण आहे असेही केसरकर यांनी म्हटलं आहे.

शिक्षक भरती करताना राज्यात किती पदं रिक्त (Job News) आहेत हेही बघावं लागतं. शिक्षक म्हणजे केवळ शिक्षक असत नाहीत, तर त्यांना गणित, विज्ञान असे विषय असतात. ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आम्ही ज्या शाळांना अनुदान देतो तेथेही अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले असतात. त्या सर्वांचं समायोजन करून भरती केली जाणार आहे; असं केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com