Job News : सर्वात मोठी बातमी !! राज्य सरकारने केली मेगाभरतीची घोषणा; कोणत्या विभागात किती पदे?

करिअरनामा ऑनलाईन । नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात (Job News) राज्य सरकारच्यावतीनं काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. तर विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्नही सुरु आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच तब्बल चार हजार पदांसाठी नोकर भरती होणार अशी घोषणा केली आहे. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कुठे आणि किती जागांसाठी भरती होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया…

डॉक्टर, तंत्रज्ञांच्या होणार भरती (Job News)

राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या चार हजार जागांची भरती करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे. आम्हीं मपसक च्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत (Job News) आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.

तसंच MPSC मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो त्यामुळे चार हजार पदांसाठी करण्यात येणारी भरती TCS च्या माध्यमातून घेतली जाईल अशीही माहिती त्यांनी (Job News) दिली आहे. आत्तापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल अशीही घोषणा त्यांनी केली आहे.

मुंबईत होणार आशा सेविकांची भरती

मुंबईतील महापालिका रुग्णालयातील बिकट परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांनी बघावं असा सवाल करण्यात आला होता. त्यावर आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांनी जशी पाच (Job News) हजार स्वच्छता दूतांची नियुक्ती केली तशी आता 5500 आशा सेविकांचीही भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com