बेरोजगारांसाठी खूशखबर! मुंबईत ८ लाख नोकर्‍या; चांगला पगार

करियर ऑनलाईन । देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. याआधीच मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परत गेले आहेत. तसेच संचारबंदीमुळे काही कामगार अद्याप घरी जाण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध झाले आहेत. सोने-चांदी, बांधकाम तसेच कापड उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत.

देशातील कोरोना संकटाची स्थिती पाहता परप्रांतीय मजूर, कामगार लवकर मुंबईची वाट धरण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक कामगारांना मोठ्या प्रमाणात व्मग्नि येणार आहे. मुंबईमधील लाखो कामगार आता कामावर नसल्याने संचारबंदीचे नियम शिथिल झाल्यावर कामगारांचा तुटवडा भासणार आहे. येथील सराफ व्यवसायात १० लाखांच्या आसपास परप्रांतीय (ओडिसा, पश्चिम बंगाल उत्तरप्रदेश) कामगार आहेत. संचारबंदीमुळे साधारण ७०% कामगार गावी गेल्याने आता इथे कामगारांना संधी असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले असून स्थानिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहनही केले आहे.

सराफ व्यवसायाबरोबरच बांधकाम आणि कापड व्यवसायातही संधी उपलब्ध असून साधारण १ ते दीड लाख कामगारांची आवश्यकता या ठिकाणीही भासणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सर्व क्षेत्रातील मिळून जवळपास ८ लाख स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी मुंबानगरीमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. ही एक सुवर्णसंधीच आहे म्हणायला हरकत नाही.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com