[Gk Update] झारखंड विधानसभा निवडणूक निकाल विशेष

करीअरनामा विशेष । नुकत्याच झारखंड मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असून, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीने राज्यात बहुमत मिळविले आहे. यात मुख्यमंत्री रघुवर दास व अन्य सहा मंत्री यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

एकूण 81 जागेंसाठी झालेल्या या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या आघाडीला एकूण 47 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत.

पक्षनिहाय निकाल
JMM – 30
BJP – 25
INC – 16
JVM – 03
RJD – 01
NCP – 01
CPI(M) -01
OTHER – 05

Total- 81 (Magic Figure -41)

पराभवाची संभाव्य कारणे-
मित्र पक्षांसोबत झालेली फारकत व आदिवासी समाजामधील नाराजी यांमुळे भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागल्याचे प्रथमदर्शनी निकालात स्पष्ट होत आहे. कारण राज्यातील अनुसुचित जमातीसाठी राखीव 28 जागांपैकी केवळ 02 जागा भाजपला जिंकता आल्या आहेत.

भाजपच्या विधानसभा 2014 मधील जागा 37 होत्या तर लोकसभा 2019 मधील जागा 11/14 अशा होत्या. मात्र या निवडणुकीत वरील सांगितल्या प्रमाणे कारणे व भाजप नेतृत्वाने घेतलेल्या काही निर्णयांचा अजेंडा हा येथील नेतृत्वाने व केंद्रीय नेतृत्वाने प्रचारत उपस्थित केल्यामुळे मतदार यांनी स्थानिक पक्षाला पाठिंबा देत सत्तेपर्यंत पोहचविले आहे. जसे की कलम 370 व राम मंदिर , NRC, व नागरिकता सुधारित कायदा अशा मुद्यांमुळे देखील भाजप मत मिळविण्यात अपयशी ठरला.

राज्यातील भाजपखेरीज आघाडीचे नेते म्हणून हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हेमंत सोरेन त्यांनी याच आघाडीसोबत पूर्वी 2013 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

घटकनिहाय निकाल खालीलप्रमाणे –

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]
———————————————————-