JEE Results 2023 : JEE Mainsचा निकाल जाहीर; उद्यापासून लगेच सुरु होणार Advanced साठी रजिस्ट्रेशन

करिअरनामा ऑनलाईन । NTA JEE मुख्य सत्र 2 चा निकाल (JEE Results 2023) जाहीर झाला आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी JEE Advanced साठी नोंदणीची प्रक्रिया दि. 30 एप्रिलपासून अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर सुरू होणार आहे. JEE Advanced परीक्षेसाठी 07 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, जेईई परीक्षा ही जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो.
JEE IIT कॉलेजमध्ये प्रवेशासाठी JEE Mains आणि JEE Advanced अशा दोन भागात परीक्षा घेतली जाते. जेईई मेन परीक्षेत यशस्वी झालेले 2 लाख 50 हजार उमेदवार JEE अॅडव्हान्स्ड (JEE Results 2023) परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. JEE Advanced परीक्षेद्वारे देशातील 23 IIT मध्ये सुमारे 16 हजार 538 जागांवर प्रवेश घेतले जातात. JEE Advanced परीक्षा 04 जून 2023 रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 आणि दुपारी 2:30 ते 5:30 या दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे.

JEE Advanced परीक्षेसाठी असं आहे आरक्षण (JEE Results 2023)
JEE Main जानेवारी आणि एप्रिल सत्र परीक्षेत यशस्वी झालेले फक्त टॉप 2 लाख 50 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 1,01,250, सर्वसाधारण EWS श्रेणीसाठी 25,000, 67,500 ओबीसी, 37,500 SC आणि 18,750 ST उमेदवारांसाठी जागा राखीव आहेत.
यावर्षी जेईई मेन परीक्षेत सुमारे 9 लाख उमेदवार बसले होते. ज्याचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये यशस्वी झालेले 2,50,000 उमेदवार JEE Advanced साठी अर्ज करू शकतील. JEE Advanced साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 एप्रिल ते 7 मे 2023 पर्यंत नियोजित करण्यात आली आहे.

असा पहा JEE Main सत्र 2 चा निकाल
1. सर्व प्रथम NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. (JEE Results 2023)
2. येथे JEE मुख्य सत्र 2 निकाल 2023 च्या लिंकवर क्लिक करा.
3. आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
4. आता JEE मुख्य निकाल 2023 डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com