JEE, NEET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार परिक्षा

Get real time updates directly on you device, subscribe now.

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी होती तसेच शाळा महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई, एनईईटी या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेईई (Joint Entrance Examination) मुख्य आणि एनईईटी (National Eligibility-cum-Entrance Test- 2020) परीक्षा सप्टेंबर मध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काही तज्ज्ञांच्या मदतीने एक अहवाल मागविण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारावर तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. पदवीपूर्व अभियांत्रिकी अभ्यासाच्या प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षा आता १ ते ६ सप्टेंबर च्या दरम्यान होणार आहे. तर ऍडव्हान्स २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. एनईईटी ची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.  यावर्षी दुसऱ्यांदा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये होणार होत्या.

देशविदेशातील आंदोलन करणारे विद्यार्थी आणि पालक यांच्याशी झालेल्या संवादानंतर या परीक्षा घेण्याच्या विचारांवर पुनर्विचार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी एनईईटी च्या विदयार्थ्यांच्या पालकांनी या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. एका व्हिडिओ संदेशामध्ये मानव संसाधन विकास मंत्री विद्यार्थ्यांना म्हणालेआहेत, “मला आशा आहे की तुम्ही या वेळेचा उपयोग चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी कराल.”

हे पण वाचा -
1 of 46

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: