JEE Mains Exam 2022 : JEE देणाऱ्यांसाठी महत्वाचं!! ऐनवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी करा ‘हे’ काम

करिअरनामा ऑनलाईन । JEE च्या पहिल्या सत्राची परीक्षा लवकरच होणार आहे. (JEE Mains Exam 2022) 20 ते 29 जून या कालावधीत हि परीक्षा होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे या परीक्षा घेण्यात येतात. JEE Main 2022 च्या जून सत्रासाठी प्रवेशपत्रे लवकरच जारी केली जातील. या सत्रासाठी अर्ज केलेले उमेदवार jeemain.nta.nic.in या वेबसाइटवरून त्यांचे JEE मुख्य प्रवेशपत्र डाउनलोड करू शकणार आहेत.

परीक्षा केंद्र आणि संबंधित शहराची माहिती प्रवेशपत्रात दिली जाईल. जेईई मेनच्या जून सत्रासाठी होणाऱ्या परीक्षेच्या शहरांची माहिती काही दिवसांत प्रसिद्ध केली जाईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 जूनपर्यंत Admit Card रिलीज होण्याची शक्यता आहे. National Testig Agency प्रवेशपत्रापूर्वी परीक्षेतील शहरांची यादी जाहीर करेल, जेणेकरून ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल, त्यांना तेथे अगोदर पोहोचण्यासाठी वेळ मिळेल.

कधी जारी होणार प्रवेशपत्र, पोर्टलवर ठेवा नजर (JEE Mains Exam 2022)

JEE मेन 2022 च्या जून सत्रासाठी प्रवेशपत्र 8 जून ते 10 जून 2022 दरम्यान जारी केले जाऊ शकते.
प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर, उमेदवार ते jeemain.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतील.
मात्र एनटीएने प्रवेशपत्र जारी करण्यासाठी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी सतत पोर्टलवर नजर ठेवण्याची गरज आहे.

परीक्षेसाठी दुसऱ्या शहरांमधील केंद्रांवर जाण्याची तयारी ठेवणं आवश्यक

प्रवेशपत्रावर उमेदवाराचे नाव, पत्ता, फोटो आणि परीक्षा केंद्र इत्यादींचा उल्लेख असेल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे. तसंच उमेदवाराला फक्त JEE मुख्य परीक्षेसाठी नियुक्त परीक्षा केंद्रावर जावे लागेल. एनटीए विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र वाटप करण्याचा प्रयत्न करते मात्र नेहमी असं होतच असं नाही. म्हणून दुसऱ्या शहरांमधील केंद्रांवर जाण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे.

प्रवेशपत्र नीट तपासून घ्या

JEE मेन्स परीक्षेसाठी जारी करण्यात आलेले प्रवेशपत्र नीट तपासून घेण्याचं आवाहन NTA कडून करण्यात आलं आहे. (JEE Mains Exam 2022) उमेदवारांनी त्यांचं नाव, आणि इतर महत्त्वाची माहिती प्रवेशपत्रावर चेक करणं आवश्यक आहे. तसंच काही चूक आढळण्यास त्वरित कळवणं आवश्यक आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com