IPS Vijay Vardhan Success Story: 35 वेळा अपयश येऊनही जिद्द सोडली नाही; शेवटी IPS झालाच!

करिअरनामा ऑनलाईन। स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी 2-3 वेळा अपयश आले कि लगेच खचतात आणि दुसरी वाट शोधतात. पण इथे काही वेगळंच घडलंय. स्पर्धा परीक्षेत 2-4 वेळा नाही तर तब्बल 35 वेळा अपयश आले तरीही न खचता IPS पदापर्यंत मजल मारणाऱ्या आवलियाची Success Story आज आपण जाणून घेणार आहोत. हा अवलिया आहे विजय वर्धन… (IPS Vijay Vardhan Success Story)

कोण आहेत विजय वर्धन-

विजय वर्धन मूळचे हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातील. विजय वर्धन यांचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणामध्येच झाले. यानंतर हिसार येथून त्यांनी 2013 मध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. विजय यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियरिंग केले आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दिल्ली गाठली व तेथूनच त्यांनी UPSC परीक्षेचे कोचिंग घेतले.

”यश सतत हातातून निसटत होते”…

विजय वर्धन सांगतात; “IPS ची तयारी करत असताना अनेकवेळा यश हातातून निसटत होते. या दरम्यान वेगवेगळ्या 30 सरकारी जागांसाठी परीक्षा दिल्या. पण त्यातही अपयश येत होते. तरीही यातून खचून न जाता UPSC ची तयारी सुरुच होती. परंतु UPSC मध्येही अपयशाचा सामना करावाच लागला. अशा परिस्थितीत हार न मानता स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली. अखेर 36 व्या प्रयत्नात UPSC पास होऊन IPS पदापर्यंत पोहचता आले. इथे कामी आली ती जिद्द आणि चिकाटी.”

मुख्य लक्ष्य UPSC च-

विजय यांचे मुख्य लक्ष्य यूपीएससी परीक्षेवर होते. त्याच अनुषंगाने त्यांनी 2014 पासून यूपीएससी परीक्षा देणे सुरू केले. 2014 आणि 2015 मध्ये विजय फक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मुख्य परीक्षेत नापास झाले. तिसऱ्यांदा विजयने आपल्या तयारीचा मार्ग बदलला. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही त्यांचा हेतू डगमगला नाही आणि 2017 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी मुलाखती पर्यंत पोहोचले. वारंवार अपयशी ठरले तरी विजय यांचा दृढ निश्चय आणि त्याहीपेक्षा धैर्य वाखाणण्याजोगे आहे. विजय वर्धन यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर विश्वास ठेवून तयारी करणे गरजेचे आहे. (IPS Vijay Vardhan Success Story)

इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा UPSC परीक्षेत पास होणं हे खूप कठीण मानलं जातं. त्यामुळे सरकारी नोकरीत इतर ठिकाणी परीक्षा देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. यूपीएससी व्यतिरिक्त A आणि B दर्जाच्या हरियाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल असे अनेक 30 वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करुन परीक्षा दिल्या होत्या. यापैकी एकही परीक्षेत त्यांची निवड झाली नाही. पण त्यांनी निराश न होता पुन्हा एकदा जोरदार तयारीला सुरुवात केली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com