भारतीय टपाल खात्यात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. १० उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुकांना भारतीय टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यापैकी ४ पदं ओबीसी आणि प्रत्येकी १ पद एससी आणि एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.

भारतीय टपाल खात्याने या पदांसाठी १० उत्तीर्ण असल्याची अट ठेवली आहे. तसंच यासाठी संबंधित उमेदवारांकडे वाहन चालवण्याचा परवाना असणंही आवश्यक आहे. या पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

टपाल खात्यात या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीत उत्तीर्ण  होणाऱ्या विद्यार्थ्यांची या पदासाठी निवड केली जाईल. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२१ निश्चित करण्यात आली आहे.या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा १९,९०० रूपये वेतन दिलं जाणार आहे. तसंच उमेदवारांचं पोस्टिंगचं स्थान मुंबई हे असणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com