Indian Army Tour of Duty : सैन्य भरतीचे नियम बदलणार?? नव्या नियमांची घोषणा होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन । लष्करातील भरतीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल (Indian Army Tour of Duty) केले जाण्याचे संकेत आहेत. नवीन नियमानुसार 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर सैनिकांच्या भरतीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असताना त्यापैकी 25 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात येईल आणि ते नवीन तारखेसह सैनिक म्हणून रुजू होऊ शकतील.

असे असतील नवीन नियम –

  • आता हवाई दल आणि नौदलातील सैनिकांची सर्व भरती टूर ऑफ ड्यूटी अंतर्गत होईल.
  • लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांमध्ये भरतीच्या नवीन प्रणालीमध्ये काही बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
  • रिपोर्ट्सनुसार, टूर ऑफ ड्यूटीच्या अंतिम निर्णयावर बरीच चर्चा झाली आहे आणि काही नवीन सूचना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
  • लवकरच यासंदर्भातील घोषणा देखील केली जाऊ शकते.
  • पगार व निवृत्ती वेतन निश्‍चितीसाठी मागील 4 वर्षांची कंत्राटी सेवा त्याच्या पूर्ण सेवेत घेतली जाणार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होणे साहजिकच आहे. (Indian Army Tour of Duty)
  • तिन्ही सेवेतील सैनिकांच्या काही ट्रेड्स याला अपवाद असतील, ज्यात तांत्रिक स्वरूपामुळे त्यांना 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेच्या नंतरही आपली सेवा देता येणार आहे.
  • यामध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही असणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • रिपोर्टनुसार लष्करी स्तरावरील भरती प्रक्रियेचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा -
1 of 10

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com