[दिनविशेष]… म्हणून आज 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो ‘भारतीय सैन्य दिन’.

करीअरनामा । दरवर्षी भारतात 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो. यावर्षी देशभरात 72 वा सैन्य दिन साजरा केला जात आहे.

आजच्या दिवशी जनरल (नंतर फील्ड मार्शल) केएम करियप्पा यांनी 1949 मध्ये जनरल सर बुचर यांच्याकडून सैन्याची कमान ताब्यात घेतली होती आणि ते पहिले सेनापती बनले आणि स्वातंत्र्यानंतरचे लष्कराचे पहिले प्रमुख बनले होते. तो दिवस आज आर्मी दिवस म्हणून साजरा केला जातो.

नि: स्वार्थ सेवा आणि बंधुता यांचे उत्कृष्ट उदाहरण देणाऱ्या आणि देशावरील प्रेमापोटी आपल्या देशातील सैनिकांचा सन्मान करण्यासाठी सर्व सैन्य कमांडच्या मुख्यालयात सैन्य दिन साजरा केला जातो. अमेरिका, रशिया आणि चीन सारख्या महासत्तेशी स्पर्धा करणारी भारतीय सेना ही जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य सेना आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे-
1) 28 वे सेना प्रमुख: जनरल मनोज मुकुंद नरवणे.
2) पाहिले CDS -जनरल बिपिन रावत

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-