Indian Armed Forces Recruitment : फक्त NDA,CDSच नाही; तर सैन्यात अधिकारी होण्याचे ‘हे’ आहेत 3 मार्ग; जाणून घ्या कोणते?

करिअरनामा ऑनलाईन । सैन्यात अधिकारी पदावर भरती (Indian Armed Forces Recruitment) होण्यासाठी UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या NDA आणि CDS परीक्षांव्यतिरिक्त इतरही अनेक मार्ग आहेत. याद्वारे भारतीय तरुण आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये अधिकारी होऊ शकतात.आज आम्ही तुम्हाला भारतीय सैन्यात अधिकारी म्हणूनभरती होण्यासाठी इतर कोणकोणते पर्याय आहेत याविषयी सांगणार आहोत.

जर तुम्हाला भारतीय लष्कर, भारतीय नौदल किंवा भारतीय वायुसेनेमध्ये अधिकारी व्हायचे असेल, तर NDA, CDS परीक्षा देणे आवश्यक नाही. NDA साठी 16.5 ते 19.5 अशी वयोमर्यादा (Indian Armed Forces Recruitment) निश्चित करण्यात आली आहे. तर, पदवीधर उमेदवार (Indian Armed Forces Recruitment) सीडीएससाठी अर्ज करू शकतात. यासाठी वयाची अट 19 ते 24 अशी निश्चित करण्यात आली आहे. हे वय पार करूनही तुम्ही सैन्यात अधिकारी होऊ शकता.

Indian Armed Forces Recruitment

जाणून घ्या कोणती परीक्षा द्यावी लागेल –

1. AFCAT- एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (Indian Armed Forces Recruitment)

पात्रता – पदवीधर आणि पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.

वय मर्यादा – फ्लाइंग आणि टेक्निकल शाखेसाठी वय 19 ते 24 वर्षे आहे. तर, बिगर तांत्रिक शाखेसाठी वयोमर्यादा 19 ते 26 वर्षे आहे.

निवड – फ्लाइंग शाखेसाठी बी.टेक मध्ये 60०% गुण आवश्यक आहेत. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. याद्वारे तरुण वायुसेनेच्या विविध शाखांमध्ये अधिकारी बनतात. यासाठी परीक्षा आहे. त्यानंतर एसएसबी, वैद्यकीय चाचणी द्यावी लागते.

 

Indian Armed Forces Recruitment

2. TGC- तांत्रिक पदवी अभ्यासक्रम

पात्रता – BE/B.Tech किंवा अंतिम वर्षाचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

वय मर्यादा – नोंदणीसाठी वयोमर्यादा 20 ते 27 आहे. (Indian Armed Forces Recruitment)

निवड – SSB आणि मेडिकल नंतर, उमेदवार इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये अधिकारी म्हणून रुजू होतात. या परीक्षेत प्रत्येक शाखेसाठी वेगळा कट ऑफ दिला जातो.

Indian Armed Forces Recruitment

3. शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल

पात्रता – BE/B.Tech किंवा अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

वय मर्यादा – पुरुष उमेदवारांसाठी 20 ते 27 वर्षे आणि महिला उमेदवारांसाठी 19 ते 25 वर्षे. (Indian Armed Forces Recruitment)

निवड – त्याचा कट ऑफ SSB नंतर सोडला जातो. भरती प्रक्रियेमध्ये नोंदणी, एसएसबी, वैद्यकीय फेऱ्यांचा समावेश असतो. यामध्ये निवड झालेले उमेदवार थेट अधिकारी बनतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com