जेईई मुख्य परीक्षेत स्वयम् चौबे राज्यात पहिला तर मुलींमध्ये इंद्रायणी तायडेची बाजी

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परिक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. गुजरातचा निसर्ग चढ्ढा देशात प्रथम आला असून, राज्यात प्रथम येण्याचा मान स्वयम् शशांक चौबे याला मिळाला आहे. चौबेचा राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक आहे. तसेच मुलींमध्ये इंद्रायणी तायडे हिने बाजी मारली आहे. १०० पर्सेंटाइल मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांत तेलंगणमधील सर्वाधिक सात विद्यार्थी आहेत.

एनटीएतर्फे वर्षातून दोनवेळा जेईई मेन्स परीक्षा घेतली जाते. जानेवारीत झालेल्या परीक्षेनंतर एप्रिलमध्ये होणारी परीक्षा कोरोना संसर्गामुळे सातत्याने पुढे ढकलावी लागली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात परीक्षा घेण्यात आली.जानेवारीत या परीक्षेसाठी देशभरातील ९ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ८ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सप्टेंबरमधील परीक्षेसाठी ८ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

देशभरातील ४ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी जानेवारी आणि सप्टेंबर अशा दोन्ही परीक्षा दिल्या .दोन्ही परीक्षांपैकी ज्या परीक्षेत सर्वात चांगली कामगिरी असेल , ते गुण ग्राह्य धरले जातात.या परीक्षेतील अडीच लाख विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले असून खुल्या गटाची पात्रता श्रेणी ९०.६५३ आहे. ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: