शिक्षण क्षेत्रात महत्वाच्या घोषणा! उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी भरीव तरतूद

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या  घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी २०२० हे शैक्षणिक वर्ष प्रचंड अडचणींचे ठरले असून, टाळेबंदीमुळे शिक्षण क्षेत्रात अनेक बदल पाहायला बघायला मिळाला आहे. या अनुषंगाने या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद, घोषणा केल्या आहेत, या अर्थसंकल्पात उच्च शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषत: संशोधन क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. संशोधनासाठी पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने ५० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली.

या दरम्यान २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील शिक्षण क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत, ते म्हणजे उच्च शिक्षणासाठी आयोग बनणार आहे, १०० नव्या सैनिक शाळांची घोषणा आहे, तर सध्या देशात ३१ सैनिकी शाळा कार्यरत आहेत. नव्या सैनिकी शाळांच्या निर्मितीसाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.तसेच एनजीओच्या सहकार्याने या सैनिकी शाळांची निर्मिती होणार आहे.

तर २०१९ च्या अर्थसंकल्पात नॅशनल रिसर्च फाउंडेशन स्थापन करण्याची घोषणा केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात या फाउंडेशनसाठी पुढील पाच वर्षांत ५० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशभरात १५ हजार आदर्श शाळा उघडणार असल्याचीही घोषणा केली आहे. १५ हजार शाळांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्यात येणार आहे, आणि लेह येथे केंद्रीय विद्यापीठाची स्थापना होणार आहे. अशा घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com