इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने जुलै प्रवेशांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. अर्ज करण्याची मुदत यापूर्वी 16 ऑगस्ट 2020 पर्यंत होती, मात्र आता ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे.

करोना व्हायरसच्या संसर्गामुळे  प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला आहे. बोर्ड परीक्षांचे निकालही उशिरा जाहीर झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली आहे.ज्या इच्छुक आणि योग्य विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नसतील ते ignou.ac.in वर जाऊन प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज – 

1 ) सर्वात आधी IGNOU च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

2) होम पेज वर रजिस्ट्रेशनच्या लिंक वर क्लिक करा.

3) यानंतर तुमच्या स्क्रीन वर नवीन पेज उघडेल.

4) नव्या पेज पर रजिस्टर करा आणि अॅप्लिकेशन फॉर्म भरा.

5) ऑनलाइन शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट – ignou.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com