CA जानेवारी परीक्षेच्या उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी; असे बदलता येतील परीक्षा केंद्र

नवी दिल्ली । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA जानेवारी २०२१ साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांची पसंती बदलण्याची परवानगी दिली आहे. ICAI CA Cycle 2 परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार २६ डिसेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर आपले परीक्षा केंद्रांचे पसंतीक्रम ऑनलाइन बदलू शकतात. (ICAI CA Cycle 2 January 2021 Exams)

CA Cycle 2 जानेवारी २०२१ परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्यासाठी ICAI CA उमेदवारांना ICAI च्या वेबसाइट वर जाऊन लॉगइन करावे लागेल. यासंदर्भात ICAI CA वेबसाइट वर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, ‘जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांकडे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे. ही सुविधा २३ डिसेंबर (२ वाजल्यापासून) से २६ डिसेंबर २०२० (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) उपलब्ध असेल.’

असे बदलता येतील परीक्षा केंद्र:
*सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जा.
*यानंतर ‘Login/ Register’ टॅब वर क्लिक करा.
*आता लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
*माहिती सबमिट करून आपलं अकाउंट तपासा.
*आता एप्लिकेशन मध्ये जाऊन परीक्षा केंद्राच्या शहरात बदल करा.

ICAI CA सेकंड सायकल परीक्षा २१ जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहेत. ICAI CA चे जे विद्यार्थी २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२० पर्यंत घेण्यात आलेली परीक्षा देऊ शकले नाहीत, ते जानेवारी/फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या सीए परीक्षेच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा देऊ शकणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’