IBPS परीक्षेतील पदवी प्रमाणपत्र अट शिथिल करण्याची मागणी

करिअरनामा ऑनलाईन । (IBPS Exam 2020) इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या केंद्रीय संस्थेतर्फे राष्ट्रीयकृत बँकांमधील २ हजार ५५७ लिपिक भरतीसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे. मात्र ही  परीक्षा देण्यासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याकडे २३ सप्टेंबरपूर्वी पदवी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

कोरोना विषाणूमुळे यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या नसल्याने अंतिम वर्षाची परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी बँक परीक्षेला मुकण्याची शक्यता असून ,२३ सप्टेंबर पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष आणि महती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी या बाबतचे निवेदन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी , प्रकाश जावडेकर याना दिले आहे.

राष्ट्रीयकृत १७ बँकांमधील लिपिक पदाच्या भरतीसाठी IBPS कडून परीक्षा यावेळी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.त्यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ सप्टेंबर पर्यंत आहे.ऑनलाईन पूर्वपरीक्षा ५ ते १३ डिसेंबर दरम्यान आणि मुख्य परीक्षा २४ जानेवारीला होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत १५ दिवस वाढविण्यात यावी,असे वेलणकर यांनी सांगितले.

IBPS Exam 2020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2020 | ३१ हजार पगार

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा?