IAS टीना डाबी आणि आमिर अहतर वेगळे होणार; घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा आॅनलाईन | सन २०१५ मध्ये भापाळमध्ये राहणाऱ्या टीना डाबी (Tina Dabi) यांनी यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केले होते. टीना डाबी यांची तेव्हा देशभर चर्चा होती. डाबी यांनी २०१५च्या बॅचमध्ये दुसरे स्थान पटकावणारे अतहर आमिर (Athar aamir khan) यांच्याशी सन २०१८ मध्ये विवाह केला. या वेळी देखील डाबी चर्चेत होत्या. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे टीना डाबी आणि अतहर आमिर यांनी जयपूरच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघांनी आता एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन वर्षांपर्यंत प्रेमात असलेल्या डाबी आणि अतहर यांनी काश्मीरच्या सौंदर्याने भारलेल्या खोऱ्यात कायमचेच एकमेकांचे झाले. टीना आणि अतहर यांनी सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेले पहलगाम हे स्थळ आपल्या विवाहासाठी निवडले होते.

हे पण वाचा -
1 of 16

काश्मीरचे राहणारे अतहर आमिर खान यांनी नागरी सेवा परीक्षेत सन २०१५ मध्ये दुसरे स्थान प्राप्त केले होते. आयएएसचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीना डाबी यांना ऑक्टोबर, २०१८ मध्ये भीलवाडा येथील उपविभागीय दंडाधिकारी (SDM) या पदावर पोस्टिंग मिळाली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: