HSC Supplementary Exam : 12वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा; ‘या’ तारखेपासून करा नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Supplementary Exam) शिक्षण मंडळाने  12वीचा निकाल जाहीर केल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेची सूचना मंडळामार्फत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी सोमवार दि. 29 रोजी अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांना 16 जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे जमा कराव्या लागणार आहेत.
बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना पुरवणी परीक्षेद्वारे परीक्षेची संधी दिली जाते. त्यासोबतच अनेक विद्यार्थी आपली श्रेणी सुधारण्यासाठी, तसेच आयटीआय ट्रान्स्फर क्रेडिट घेणारे विद्यार्थी, खासगी प्रविष्ट विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. दरम्यान, ज्या (HSC Supplementary Exam) विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत ही परीक्षा द्यायची आहे त्यांना पुरवणी परीक्षा व फेब्रुवारी-मार्च 2024 अशा परीक्षेच्या दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत. तसेच बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्च 2023 च्या परीक्षेतील माहिती ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रात घेता येणार आहे.

काही महत्वाच्या तारखा – (HSC Supplementary Exam)
1. दि. 29 मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध
2. दि. 9 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना निमयित शुल्क भरून हे ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार
3. 10 ते 14 जूनदरम्यान विलंब शुल्क भरून अर्ज दाखल करता येणार
4. दि. 1 ते 15 जूनदरम्यान संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजला चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावे लागणार (HSC Supplementary Exam)
5. दि. 16 जूनपर्यंत चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे जमा करण्यासाठी मुदत
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com