HSC Result 2020 | गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाईन; शाळेत जाऊन अर्ज करण्याची गरज नाही

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. अर्ज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने  पाहता येणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्याकंन, गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत, आणि  स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याचा निर्णय राज्यमंडळाने घेतला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर ज्या विद्यार्थ्यांना  गुणपडताळणी करायची आहे त्यांना निकाल जाहीर झाल्यावर 10 दिवसात ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरु केली जाईल. बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.

बारावीचा निकाल खाली दिलेल्या वेबसाईटवर पाहता येईल –

http://www.mahresult.nic.in/

गुणपडताळणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करा – 

http://verification.mh-hsc.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com