HSC Result 2022 : मोठी बातमी !! 08 जून ला जाहीर होणार 12 वीचा निकाल; कधी आणि कुठे पाहता येणार निकाल…

करिअरनामा ऑनलाईन । यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी (HSC Result 2022) बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल.

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे.

किती वाजता जाहीर होणार निकाल

दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल 8 जूनला दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

निकालाची प्रिंट घ्या (HSC Result 2022)

निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत (HSC Result 2022) असला तरीही क्रॉस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. या दरम्यान पुढील प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे.

सर्व माहिती तपासून घ्या

निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. (HSC Result 2022) तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

पुढील प्रवेशासाठी हि कागदपत्रे ठेवा जवळ –

गुणपत्रिका (Board Marksheet)

स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate)

उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate)

कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

आधार कार्ड (Aadhar card)

जातीचा दाखला (Caste Certificate)

रहिवासी दाखला (Address Proof)

पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)

  • निकाल पाहण्यासाठी या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –
  1. mahresult.nic.in
  2. maharashtraeducation.com
  3. mahahsscboard.maharashtra.gov.in
  4. sscresult.mkcl.org 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com