How to Become ED Officer : ED ऑफिसर होण्यासाठी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; ‘इतका’ मिळतो पगार

करिअरनामा ऑनलाईन । सध्या देशभरात (How to Become ED Officer) अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच EDची चर्चा आहे. भल्याभल्या राजकारण्यांनी ED या दोन शब्दाचा मोठा धसका घेतला आहे. यामुळे ईडी कार्यालय, ईडी अधिकारी यांची देखील देशभरात चर्चा आहे. ईडी कार्यालयात नोकरी मिळविण्यासाठी काय करावं लागत? ईडी ऑफिसर बनण्याची पात्रता काय? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. याचा सविस्तर तपशील आज आपण जाणून घेऊया.

ED देशातील शक्तिशाली संस्था 

ईडी ही भारतातील एक अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली (How to Become ED Officer) संस्था म्हणून ओळखली जाते. देश आणि परदेशातील कोणत्याही मालमत्तेशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे काम ईडी करते. ईडी अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड IAS, IPS इत्यादी रँकच्या आधारे केली जाते.

ED मध्ये नोकरी कशी मिळवायची?

1. ED मध्ये, ग्रुप A, B आणि C साठी अनेक पदांची भरती (How to Become ED Officer) केली जाते. त्यापैकी काही पदांवर प्रति नियुक्तीवर, तर काही पदांवर पदोन्नती व निवड प्रक्रियेच्या आधारे भरती केली जाते. ग्रुप A पदांवर प्रतिनियुक्ती आधारावर भरती केली जाते. त्याअंतर्गत विशेष संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक अशी पदे येतात.

2. ग्रुप B च्या काही पदांवर पदोन्नतीने किंवा थेट भरती केली जाते. ग्रुप बी सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी पदासाठी निवड स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केली जाते. दुसरीकडे, विविध भरती प्रक्रियेच्या आधारे ईडीद्वारे वेळोवेळी ग्रुप सी पदांची भरती केली जाते.

ही पात्रता आवश्यक (How to Become ED Officer)

1. ED मध्ये सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी बनण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणारी CGL परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. एसएससी सीजीएल परीक्षेत बसण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
3. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी. तसेच काही विशेष पदांसाठी, कमाल वयोमर्यादा केवळ 27 वर्षे आहे.
4. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट मिळते. (How to Become ED Officer)

2 स्तरात होते निवड

सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, टियर 1 आणि 2 साठी निवड प्रक्रियेचे दोन स्तर आहेत.

स्तर 1 : टियर 1 परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. परीक्षेत जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या चार विषयांचे ऑब्जेक्टिव प्रश्न असतात. (How to Become ED Officer)
स्तर 2 : टियर 2 परीक्षेत तीन पेपर असतात, पेपर 1, 2 आणि 3. पेपर 1 सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे. तथापि, पेपर 2 आणि 3 ASO आणि AAO साठी पर्यायी असतील.

इतका मिळतो पगार आणि भत्ते

  1. सहाय्यक अंमलबजावणी अधिकाऱ्याचे जॉब प्रोफाईल भारत सरकार अंतर्गत ग्रुप B राजपत्रित अधिकारी आहे.
  2. सहाय्यक अंमलबजावणी अधिकाऱ्याला मूळ वेतनासह बरेच भत्ते मिळतात. (How to Become ED Officer)
  3. सहाय्यक अंमलबजावणी अधिकाऱ्याच्या पगाराबद्दल बोलायचे तर सातव्या वेतन आयोगानुसार  44,900 रुपये ते 1,42,400 रुपये दरमहा आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com