आता LIC परीक्षेत हिंदी सक्तीचीचं !

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।   आता  LIC च्या ज्या परीक्षा घेण्यात येतील त्या सर्व परीक्षामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची केली आहे. एलआयसी ऑफ इंडियामध्ये देशभरातील साडेसात हजारांहून अधिक पदांवरील भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. मात्र आता हिंदी विषयासाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भरतीच्या जाहिराती वेबसाइटवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात २१६ पदांसाठी भरती होणार आहे. भरतीसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षा १०० गुणांची असून यात इंग्रजी किंवा हिंदी भाषेचे कौशल्य ४०, अंकक्षमता ३५, कारणक्षमता ३५ अशी गुण विभागणी आहे. ही विभागणी देशभरात समान आहे. यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २०० गुणांची मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी दक्षिण, पूर्व, ईशान्य भारत वगळता उर्वरित भागातील उमेदवारांसाठी परीक्षेसाठी पाच विषय असून पाचवा विषय हा हिंदी भाषेचा आहे. पश्चिम क्षेत्रातील म्हणजेच महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात येथील उमेदवारांना ४० गुणांची हिंदीची परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा सक्तीची आहे.

एलआयसीच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे हिंदीची परीक्षा घेण्यात काहीच अर्थ नाही, असा युक्तिवाद हे उमेदवार करत आहेत.
_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

हे पण वाचा -
1 of 349

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.