आरोग्य विभागाची आज आणि उद्या होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : आरोग्य विभागातील गट क आणि गट ड विभागातील विविध पदांसाठी आज शनिवार दिनांक 25 सप्टेंबर आणि रविवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र परीक्षा रद्द झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज आणि उदया परीक्षा होणार नसून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिलं होतं. मात्र या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

आरोग्य विभागा अंतर्गत गट क मध्ये रासायनिक सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक, अधिकारी रक्तपेढी, तंत्रज्ञ, आहारतज्ञ, अधिपरिचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक तसंच गट ड या अंतर्गत शिपाई, कक्ष सेवक ,बाह्यरुग्ण सेवक ,अपघात विभागात सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी ,परिचर, दंत सहाय्यक, पुरुष किंवा स्त्री परिषद, व कुशल कारागीर, मदतनीस इत्यादी पदांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही भरती करण्यात येणार होती.

२५/ २६ तारखेच्या परीक्षेसाठी उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नव्हती. अनेकांचे प्रवेश पत्र अजूनही मिळालेले नाही. यातच प्रवेश पत्रा वर फोटो केंद्र आणि वेळ नाही. दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही. यासाठी देण्यात आलेले संकेतस्थळ अनेकदा हँग होत होतं. अशा अनेक अडचणी लक्षात घेता ही परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com