जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणी पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबरला परीक्षा

करीअरनामा । राष्ट्रीय सीमा शुल्क,अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंबंधी केंद्रीय वित्त मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक निर्गमित केल्यानुसार नियम ८३ (२) च्या अधीन जीएसटी नेटवर्कवर नोंदणीकृत झालेले आणि नियम ८३ (१) (ख) च्या अंतर्गत येणारे जीएसटीपी अर्थात जे सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर किंवा टॅक्स रिटर्न प्रिपेयरर म्हणून काम केलेले आणि तत्कालीन कायद्यांतर्गत पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असेलेले प्रॅक्टिशनर यांना ३१ डिसेंबर २०१९ च्या आत परीक्षा देणे आवश्यक आहे.


अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ डिसेंबर 2019


परीक्षा फी – ५००/-


ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा – www.careernama.com


परीक्षेचे स्वरूप
जीएसटी कायदा आणि प्रकिया-वेळ २ तास ३० मिनिट,
बहुपर्यायी प्रश्न संख्या १००,
भाषा इंग्रजी किंवा हिंदी, गुण २००,
पात्रता गुण किमान १००,
निगेटिव्ह मार्किंग नाही,


अभ्यासक्रम –
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७,एकात्मिक वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, सर्व राज्यांचे वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, केंद्रशासित प्रदेशातील वस्तू आणि सेवाकर अधिनियम २०१७, वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, परिपत्रके आणि आदेश याप्रमाणे अभ्यासक्रम राहणार आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही सातत्याने विकसित होत असलेली प्रणाली आहे. यामुळे या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या माहितीवर आधारित असेल.


ताज्या अपडेटस् साठी आमच्या वेबसाईट करीअरनामा ला भेट देत रहा.