इंटरनेट क्षेत्रात होणार क्रांती; GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Get real time updates directly on you device, subscribe now.

नवी दिल्ली | भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) जीसॅट-३० GSAT-30 या दूरसंचार उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले. आज पहाटे २ वाजून ३५ मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.

GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे ३,१०० किलो आहे. लाँचिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे.

यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ए हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे GSAT-30 हा दुरसंचार उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे. जीसॅट-३० हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल.

GSAT-30 या दुरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: