ग्रामविकास विभागात लवकरच मेगाभरती होणार, 8 हजार पदापेक्षा जास्त पदे

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्‍यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, असे टोपे यांनी सांगितले. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com