Gram Sevak Bharti 2022: ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदे रद्द होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय काय?

करिअरनामा ऑनलाईन। ग्रामसेवक (Gram Sevak) आणि ग्रामविकास अधिकारी ( Village Development Officer) पदाकरिता परीक्षा देणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (Gram Sevak Bharti 2022) ग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत. याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल. यासंबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार, राज्य सरकारनेदेखील ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.
नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासाठीची समिती नेमण्यात आली आहे. रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा सविस्तर अभ्यास या समितीतर्फे केला जाईल आणि त्यानुसार नवीन पदासाठीचे नियम ठरवले जातील. समितीने सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

या गोष्टींचा अभ्यास करून होणार निर्णय – (Gram Sevak Bharti 2022)

  • ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवे पद निर्माण करण्याची आवश्यकता आणि त्याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे.
  • तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास केला जाईल.
  • तसेच वेतन, वेतन श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि इतर बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीत अहवाल सादर करणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com