महापोर्टलद्वारे परीक्षा घेतल्यास न्यायालयात जाऊ – वंचित बहुजन आघाडी

करिअरनामा । महापरीक्षा पोर्टल देशातील सर्वात मोठा आॅनलाइन परीक्षा घोटाळा आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आधारे महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेतील अयोग्य उमेदवारांची निवड झाली आहे. गैरव्यवहाराची जलदगती न्यायालयीन चौकशी करून गुन्हे दाखल करावे, तसेच आजवरची निवड प्रक्रिया रद्द करावीत अशी मागणी होत आहे.

राज्यात भरती करण्यासाठी महापरीक्षा पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलची जबाबदारी कंत्राटामार्फत यूएसटी इंटरनॅशनल आयटी कंपनीला देण्यात आली; मात्र या पोर्टलद्वारे आॅनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास सुरुवात झाल्यानंतर गोंधळ सुरू झाले. पारदर्शकतेच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहाराच्या अनेक घटना पुढे आल्या.

पात्रतेऐवजी जात, आडनाव, वशिल्यावर अयोग्य उमेदवारांची निवड करण्यात आली. त्या महाभरतीमध्ये भ्रष्टाचार आहे. कोणतीही पारदर्शकता नाही. प्रश्नपत्रिका दिली जात नाही. उत्तर पत्रिकाही नाही. टीक मार्क केलेली पत्रिकाही मिळत नाही. त्यामुळे या कंपनीबाबत अनेक शंका आहेत.

महापोर्टलमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून उपाययोजना करण्याचे ठरले. तोपर्यंत पशुसंवर्धन विभागाची भरती पोर्टलद्वारेच घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसे झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने न्यायालयात प्रकरण दाखल केले जाईल, असे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे.तत्काळ पोर्टल भरती बंद करून आॅनलाइन परीक्षा घेण्याची मागणी झाली. त्यावेळी पोर्टलद्वारे भरतीला स्थगिती देण्यात आली.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”