GK Updates : असं कोणतं शहर आहे, तिथे संपूर्ण जगाची लोकसंख्या समावू शकते?

करिअरनामा ऑनलाईन । देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांसाठी (GK Updates) तयारी करत असतात. यातील काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काहींना विविध कारणांमुळे अपयश मिळतं. यश मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाची तसेच परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या अभ्यासक्रमाची तसेच चालू घडामोडींची उत्तम माहिती असणं गरजेचं आहे. कारण नोकरीच्या भरतीमध्ये जिथे निवड मुलाखतीच्या आधारे होते, तिथे काही वेळा अभ्यासक्रमाबाहेरचेही प्रश्न विचारले जातात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी काही प्रश्न घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे…

प्रश्न – असं कोणतं शहर आहे, तिथे संपूर्ण जगाची लोकसंख्या समावू शकते?
उत्तर – लॅन्स एंजेलिस (Lance Angelis) हे एक असं शहर आहे ज्यामध्ये संपूर्ण जगाची लोकसंख्या समावू शकते…

प्रश्न- जगातील सर्वात हुशार प्राणी कोण आहे ?
उत्तर- चिंपांझी (Chimpanzee) हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. तो माणसासारखा विचार करू शकतो,असं म्हटलं जातं.

प्रश्न – असा कोणता देश आहे तिथे फक्त 825 लोक राहतात?
उत्तर- 2019 च्या जनगणनेनुसार व्हॅटिकन सिटी (Vatican City) मध्ये फक्त 825 लोक राहतात. याला जगातील सर्वात लहान राज्य असेही म्हटले जाते…

प्रश्न – पहाडांची मल्लिका कोणाला म्हटलं जातं ?
उत्तर – पहाडांची मल्लिका नेतरहाटला (Netarhat) म्हटलं जातं , हे ठिकाण झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात आहे.

प्रश्न – जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणतं आहे ?
उत्तर – (GK Updates)

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (California) डेथ नावाचे ठिकाण आहे, ते जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानलं जातं.

प्रश्न – सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता आहे ?
उत्तर – सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्याचे नाव गिधाड आहे.

प्रश्न – आशियातील सर्वात उष्ण शहर कोणते आहे ?
उत्तर – पाकिस्तानचे जेकोबाबाद (Jacobabad) हे असं शहर आहे, जे आशियातील सर्वात उष्ण ठिकाण
असल्याचे म्हटलं जातं…

प्रश्न – माणूस न झोपता किती दिवस जगू शकतो ?
उत्तर – माणूस न झोपता फक्त 11 दिवस जगू शकतो. यापेक्षा जास्त दिवस जगणं शक्य नाही…

प्रश्न – जगातील पाहिलं पुस्तक प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीचे नाव काय ?
उत्तर – जगातील पहिले पुस्तक छापणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘कोस्टर’ आहे. (GK Updates)

प्रश्न – जगातील सर्वात स्वस्त वीज कोणत्या देशात मिळते ?
उत्तर – कतार (Qatar)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com