GK Update : पहा KBC मधील ‘हे’ 18 प्रश्न, अन् चेक करा तुमची GK लेव्हल

करिअरनामा ऑनलाईन। कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन दिवसेंदिवस अधिकच रंजक होत आहे. आपण पाहतो (GK Update) की होत सीटवर बसलेल्या अनेक स्पर्धकांना अगदी सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत आणि त्यांना नाईलाजाने खेळ सोडावा लागतो. KBC मध्ये स्पर्धकांना विचारले जाणारे प्रश्न अनेक प्रेक्षकांना खूप सोपे वाटत असतात. KBC शो टीव्ही वर सुरु असताना आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, मी तिथे असतो तर लगेच उत्तर दिलं असतं. तुमचं सामान्य ज्ञान स्ट्रॉंग असेल तर पहा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का?

10 हजारांसाठी विचारलेला प्रश्न :-

1) जसं बांग्लादेशासाठी ‘अमर शोनार बांगला’ अमेरिकेसाठी ‘स्टार स्पॅन्ग्ल्ड बॅनर’ असेल तसं मग भारतासाठी काय आहे ?
पर्याय :-
A. इंकलाब जिंदाबाद
B. सत्यमेव जयते
C. वन्दे मातरम
D. जन गण मन

बरोबर उत्तर – D. जन गण मन

80 हजारांसाठी विचारलेला प्रश्न :-

2) कवीने घेतलेल्या उपनामासाठी कोणता शब्द वापरला जातो, जो सहसा गझलच्या शेवटच्या शेरमध्ये दिसतो ?
पर्याय :-
A. तखल्लुस
B. मतला
C. काफिया
D. रदीफ

बरोबर उत्तर – A. तखल्लुस

25 लाखांसाठी साठी विचारलेला प्रश्न :- (GK Update)

3) असं कोणतं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्या विमानतळाचे नाव वैमानिकाच्या नावावर आहे ?
पर्याय :-
A. तिरुवनंतपुरम
B. जोधपुर
C. भुवनेश्वर
D. गुवाहटी

बरोबर उत्तर – भुवनेश्वर (बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर)

हे प्रश्न वाचताना तुम्हाला आता थोडा इंटरेस्ट निर्माण झाला असेल; चला तर मग KBC 14 मध्ये विचारलेले आणखी काही प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहूया….

4) प्रश्न – भारत सरकारने जून 2022 मध्ये सुरू केलेल्या विदेशी व्यापार विश्लेषण पोर्टलचं नाव काय आहे ?
पर्याय :-
A. निर्यात
B. व्यवसाय
C. मार्केट
D. एंटरप्राइझ

बरोबर उत्तर – A. निर्यात

5) प्रश्न – हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने कोणत्या देवाच्या कोपापासून आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला ?
पर्याय :-
A. अग्निदेव
B. इंद्रदेव
C. भगवान शिव
D. वायुदेव

बरोबर उत्तर – B. इंद्रदेव

6) प्रश्‍न – भारतातील कोणत्या राज्यात स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांच्या नावाने असलेला जिल्हा आहे ?
पर्याय :-
A. उत्तर प्रदेश
B. पंजाब
C. हरियाणा
D. उत्तराखंड

बरोबर उत्तर – D. उत्तराखंड ( जिल्हा :- उधम सिंह नगर)

7) प्रश्‍न – राजस्थानमधील अलवर येथील कुंभारकामाच्या तंत्राचे नाव काय आहे, ज्यामध्ये मातीचा अत्यंत पातळ थर वापरला जातो ?
पर्याय :-
A. कागदी
B. रेशमी
C. बारीक
D. फुलका

बरोबर उत्तर- A. कागदी

8) प्रश्न – भारतातील असा कोणता लेखक आहे, त्याची आई राज्य उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश बनणारी पहिली महिला होती?

A. अमिताव घोष
B. समित बसू
C. विक्रम सेठ
D. अशोक बनकर

बरोबर उत्तर – C. विक्रम सेठ

9) प्रश्न – 1912 मध्ये कार्पाथिया जहाजाने ‘कोणत्या’ जहाजातील लोकांना बुडताना वाचवलं होतं?
पर्याय :-
A. ब्रिटानिक
B. टायटॅनिक
C. डी हाईलँडर
D. क्विअर मेरी २

हे पण वाचा -
1 of 126

बरोबर उत्तर – B. टायटॅनिक

10) प्रश्न – बोरिस जॉन्सन यांनी 2022 मध्ये कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली ?
पर्याय :-
A. स्पेन
B. फ्रान्स
C. अमेरिका
D. युनायटेड किंगडम

बरोबर उत्तर – D. युनायटेड किंगडम

11) प्रश्‍न – भीमाने कोणत्या राक्षसाचा वध केला, जो आपल्या भयंकर भुकेसाठी अन्न घेऊन येणाऱ्या लोकांनाही खाऊन टाकण्यासाठी कुप्रसिद्ध होता ?
पर्याय :-
A. रक्तबीज

B. बकासुरा
C. रावण
D. शेषनाग

बरोबर उत्तर- B. बकासुरा

12) प्रश्‍न – 2019 मध्ये गृह मंत्रालयाने दिलेला राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणाच्या नावावर आहे?
पर्याय :-
A. सरदार वल्लभभाई पटेल
B. महात्मा गांधी
C. पंडित नेहरू
D. सेनापती बापट

बरोबर उत्तर – A. सरदार वल्लभभाई पटेल

13) प्रश्न – जर अकाल तख्त एक्स्प्रेस ट्रेन पश्चिम बंगालमधून सुरू झाली तर तिचा प्रवास कुठे संपेल ?
A. पाटणा
B. अमृतसर
C. पटियाला
D. नांदेड

बरोबर उत्तर – B. अमृतसर

14) प्रश्‍न – पंडित शिवकुमार शर्मा हे यापैकी कोणत्या वाद्याचे प्रवर्तक होते ?
A. सितार
B. संतूर
C. सूरबहार
D. मेंडोलिन

बरोबर उत्तर – B. संतूर

15) प्रश्न – महाभारतातील कुंतीचा ज्येष्ठ पुत्र कोण होता ?
A. युधिष्ठिर
B. भीमा
C. कर्ण
D. अर्जुन

बरोबर उत्तर – C. कर्ण

16) प्रश्न – उत्तर प्रदेशातील कोणता स्तूप गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीनंतरच्या पहिल्या उपदेशाचे स्मरणस्थान मानले जाते ?
A. चौखंडी स्तूप
B. सुजाता स्तूप
C. धामेक स्तूप
D. धौली स्तूप

बरोबर उत्तर – C. धामेक स्तूप

17) प्रश्न – कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने अलीकडेच जुलै : 2022 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ?
A. बाबर आझम
B. बेन स्टोक्स
C. जो रूट
D. विराट कोहली

बरोबर उत्तर – B. बेन स्टोक्स

18) प्रश्न – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ‘कोणत्या’ युरोपियन शहराच्या महापौरांनी 30 मे 2022 रोजी विशेष ट्रामला हिरवा झेंडा दाखवला होता ?
A. पोझान
B. वॉर्सा
C. व्रोक्लॉ
D. क्राकाऊ

बरोबर उत्तर – C. व्रोक्लॉ

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com