GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली ; 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली आहे. ज्या उमेदवारांनी गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आपल्या अर्जात २३ नोव्हेंबरपर्यंत सुधारणा करू शकतात. यापूर्वी ही मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र पुन्हा एकदा आयआयटी मुंबईने ही करेक्शन विंडो २३ नोव्हेंबरपर्यंत उघडली आहे. उमेदवार आपली कॅटेगरी, परीक्षा केंद्र ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटद्वारे बदलू शकतील.

GATE 2021 परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ पासून उपलब्ध केले जाणार आहेत. या प्रवेश परीक्षेचा निकाल मार्च २०२१ मध्ये जारी केला जाणार आहे.

GATE 2021 मध्ये दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नवे विषय – पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग आणि मानवतावाद आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश गेट २०२१ मध्ये करण्यात आल्याने एकूण विषयांची संख्या आता २७ झाली आहे.

करेक्शन करण्याची शेवटची तारीख – २३ नोव्हेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट – gate.iitb.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

कोविड योद्ध्यांच्या मुलांना मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात आरक्षण

MAT 2020 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी ; असे करा डाऊनलोड

ICWAI Exam Dates 2020| डिसेंबरमध्ये होणार परीक्षा; पहा वेळापत्रक

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

\