खुशखबर ! गडचिरोलीमध्ये ५७५ जागांची पोलीस भरती होणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।  जिल्हा पोलीस दलाची राखीव जागांच्या तिढ्यामुळे रखडलेली पदभरती लवकरच घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा पोलीस दलाच्या जवळपास ३२५ जागा आणि देसाईगंज येथे कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालियनसाठी २५० जागांची मिळून ५७५ जागांची भरती जिल्ह्यात होणार असल्याचं ही बलकवडे यांनी यावेळी सांगितलं.

ऑगस्ट महिन्यात काढलेल्या जीआरनुसार जिल्ह्यात मराठा आरक्षण लागू करत आरक्षित जागांची फेररचना केली होती. परंतू लगेच त्याला स्थगिती दिली. तेव्हापासून पदभरतीची प्रक्रिया रखडली आहे. आता त्यावर तोडगा काढून पोलीस भरतीचा मार्ग काढण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे लवकरच पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बेरोजगार युवकांमधील कौशल्य विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या मदतीने भरतीपूर्व प्रशिक्षणही सुरू केले जाणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलपीडित कुटुंबातील सदस्यांसाठी जिल्ह्यातील पदभरतीसाठी काही जागा राखीव आहेत. परंतू पीडितांची संख्या जास्त आणि निघणाऱ्या जागा मोजक्या असल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. त्यासाठी सदर नक्षलीपिडीतांसाठी इतरही जिल्ह्यातील भरतीत जागा राखीव असाव्या असा प्रस्ताव आपण राज्य शासनाला दिला आहे. त्याला मंजुरी मिळण्याची आशा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली.

_—-__

हे पण वाचा -
1 of 349

अधिक माहितीसाठी – http://www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: