First Woman Combat Aviator : गौरवास्पद!! देशाला मिळाली पहिली फायटर पायलट महिला; कॅप्टन अभिलाषा बराकचा पराक्रम

करिअरनामा ऑनलाईन । भारताने तीन वर्षांपूर्वी संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून महिलांचा (First Woman Combat Aviator) समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या तीन वर्षांनंतर कॅप्टन अभिलाषा बराक बुधवारी लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ पायलट बनल्या. अभिलाषाची कामगिरी तरुणांबरोबर युवा वर्गासाठी प्रेरणा देणारी आहे.

अभिलाषाची ऐतिहासिक कामगिरी –

लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्समध्ये रुजू झाल्यामुळे आजचा दिवस लष्करासाठी ऐतिहासिक ठरला. आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये रुजू होण्यापूर्वी अभिलाषा या नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यात गुंतलेल्या होत्या. एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आज महिला विमानचालक म्हणून त्यांचा लष्करात समावेश करण्यात आला आहे.

अभिलाषा या मूळच्या हरियाणातील रहिवासी असून त्यांचे वडीलही सेनेत होते. (First Woman Combat Aviator) अभिलाषा यांना सप्टेंबर 2018 मध्ये आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्समध्ये नियुक्त करण्यात आले होते. नाशिक येथील प्रशिक्षण शाळेत एका समारंभाच्या वेळी विमान वाहतूक महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते 36 वैमानिकांसह त्यांना ‘विंग्स’ या चिन्हाने सन्मानित करण्यात आले.

‘2072 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रन सेकंड फ्लाइट’ अभिलाषाच्या हाती –

याबाबत माहिती देताना लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, अभिलाषा यांना 2072 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रन सेकंड फ्लाइटसाठी नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलामध्ये महिला अधिकारी दीर्घकाळापासून हेलिकॉप्टर उडवत आहेत. याची सुरुवात लष्करात 2021 मध्ये झाली आहे. नॅशनल डिफेन्स अकादमीने जून 2022 मध्ये महिला कॅडेट्सची पहिली तुकडी समाविष्ट करण्यास सहमती दर्शवली, तेव्हा बराक या लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक बनल्या. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये ऐतिहासिक आदेश देऊन महिलांसाठी अकादमीचे दरवाजे उघडले होते.

हि संधी म्हणजे योगायोगाच – (First Woman Combat Aviator)

2018 मध्ये चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून अभिलाषा यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांची आर्मी एव्हिएशन कोअरमध्ये निवड झाली. फॉर्म भरताना त्यांना आपण स्वत: केवळ ग्राउंड ड्युटी रोलसाठी पात्र असल्याची जाणीव होती. मात्र, अर्जात त्यांनी हवाई उड्डाणासाठी अभ्यासक्रमांच्या पात्रतांवरही मोहोर उमटवून या विषयात आवड दाखवली होती.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com