Farmer Success Story : लाखो रुपयाच्या पगारावर मारली लाथ; मायदेशी परतून शेती केली आणि झाला मालामाल

करिअरनामा ऑनलाईन । आज संपूर्ण जगात भारतीय शेतीचा डंका (Farmer Success Story) वाजत आहे. आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतात अलीकडे शेतीचा विस्तार झपाट्याने होत आहे. आता शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

संपूर्ण जगात भारतात उत्पादित होणारा शेतमाल निर्यात केला जात आहे. या विदेशी निर्यातीतून शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत आहे. यामुळेच आता तरुणवर्ग देखील शेतीला अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता उच्चशिक्षित तरुण देखील शेती व्यवसायाकडे वळत आहे.

उच्चशिक्षित तरुण शेतीतुन चांगला नफा देखील कमावत आहे. काही अवलिया तरुण आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवून पुन्हा एकदा शेतीकडे वळत (Farmer Success Story) असल्याचे चित्र आहे. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. उत्तर प्रदेशातील अजित प्रताप, ज्याने जर्मनीत काम केल्यानंतर भारतात येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला याच्या विषयी माहिती घेवूया…

जर्मनीतील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडली (Farmer Success Story)

एकेकाळी जर्मनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या अजितने आपल्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत मायदेशी परत येवून शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित प्रताप सध्या हिरव्या वाटाण्याचे उत्पादन करून करोडो रुपयांचा नफा कमवत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर शेतकऱ्यांनीही या पिकाच्या लागवडीला महत्त्व देण्यास सुरवात केली आहे.

उत्तर प्रदेशचे अजित प्रताप यांनी IIBM इंदूर येथून MBA चे शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांची जर्मनीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. परदेशात जाऊनही त्यांची देशाच्या मातीशी असलेली ओढ कमी झाली नाही आणि ते अल्पावधीतच भारतात परतले. भारतात आल्यानंतर येथील (Farmer Success Story) शेतकरी ओसाड जमिनीवर जवसाची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत असल्याचे अजितने पाहिले. यातून प्रेरीत होऊन त्यांनी शास्त्रीय पद्धतीने वाटाणा पिकवण्याचा निर्णय घेतला आणि आज सुमारे 25 एकर जमिनीवर वाटाणा पिकवून ते वर्षाला 5 कोटी रुपये उत्पन्न घेत आहेत.

शेतीसह उभारलं उत्पादन युनिट

अजित प्रताप केवळ मटारचीच लागवड करत नाहीत, तर त्यांनी त्यांच्या बियाण्यांच्या प्रक्रियेसाठी एक उत्पादन युनिट देखील स्थापन केले आहे, ज्यामध्ये वाटाणा बियाण्याची प्रतवारी, प्रक्रिया आणि पॅकेजिंग देखील केले जाते. अजित प्रताप मटारच्या लागवडीसाठी सुधारित जातींचे बियाणे (Farmer Success Story) वापरतात. अजित सांगतात की, वाटाणा पिकवण्यासाठी एकरी 15,000 रुपये खर्च येतो, त्यानंतर ऑन-सीझन ते ऑफ-सीझनपर्यंत तुम्हाला 80,000 पर्यंत उत्पन्न मिळू शकते.

वाटाणा जातो परदेशात (Farmer Success Story)

शेतीसोबतच मटारची प्रतवारी, प्रक्रिया आणि पॅकेजिंग करणारे अजित प्रताप आज आपल्या शेतातून बांगलादेश, युरोप आणि नेपाळसारख्या अनेक देशांमध्ये मटार निर्यात करत आहेत. ते स्वत: स्वावलंबी झाले असून गावातील अनेक शेतकरी, मजुरांना त्यांनी रोजगारही दिला आहे. अजित प्रताप यांच्या जालौन गावातील अनेक शेतकरी आज त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर वाटाणा पिकवून चांगले पैसे कमावत आहेत.

वाटाणा लागवडीतून भरघोस उत्पन्न

साहजिकच वाटाणा भाजीपाला आणि कडधान्ये म्हणून वापरतात, म्हणूनच याला नगदी पीकाचा दर्जा प्राप्त आहे. भारतात, हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात मटारांना चांगली (Farmer Success Story) मागणी असते, त्यामुळे लोक ऑफ सिझनमध्येही फ्रोजन मटारचा व्यवसाय करून भरपूर नफा कमावत आहेत.

मटारच्या लागवडीबाबत अजित प्रताप सांगतात की, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी वाटाणा शेतीसाठी पीएसएम-3 आणि एपी-3 वाणांची पेरणी करून खूप (Farmer Success Story) चांगले उत्पादन मिळवू शकतात. या जातींची पेरणी केल्यानंतर 43 दिवसांत उत्पादन सुरू होते, यातून 1 हेक्‍टरपासून 20 क्विंटलपर्यंत उत्पादन आणि 1 एकरापासून दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com