विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढला ; प्रत्येक पेपरला 15 मिनिटं वाढवून भेटणार

करिअरनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण व परीक्षा ऑनलाईनच्या माध्यमातून पार पडल्या.दरम्यान आता कोरोनाची परिस्थिती निंयत्रणात आल्याने सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला. आता या ऑफलाईन परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी युवासेनेने केली होती. या दरम्यान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला आहे.’

दरम्यान, यावर्षी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला होता. आता विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला आहे. याबाबत माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com