IIM CAT 2020 परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय व्यवस्थापन संस्थेसह (IIM) अनेक टॉप मॅनेजमेंट / बिझनेस संस्थांमधील अभ्यासक्रमांसाठी कॉमन अॅ़डमिशन टेस्ट अर्थात कॅट (CAT) परीक्षा दिली जाते. कॅट 2020 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर होती आता या परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात अली असून कॅट 2020 देऊ इच्छिणारे उमेदवार आता 23 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात.

देशातील 20 IIM मधील MBA / PGDM अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. कॅट 2020 देऊ इच्छिणारे उमेदवार आता 23 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन रजिस्ट्रेशन / अॅप्लिकेशनची लिंक पुढे दिली जात आहे. त्या लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल.

आयआयएम कॅट 2020 परीक्षा 29 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे. परीक्षेचे अॅडमिट कार्ड 28 ऑक्टोबर 2020 रोजी जारी केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून 28 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://iimcat.ac.in/per/g01/pub/756/ASM/WebPortal/1/index.html?756@@1@@1

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com