बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

करिअरनामा । राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी ची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरु होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. येत्या 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी

बारावीच्या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच गणित, कला आणि विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी अनेक विषयांच्या पेपरमध्ये एक दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.

राज्यात  273 भरारी पथकं 

परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने मंडळातर्फे राज्यात 273 भरारी पथकं नेमण्यात आली आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित असणं आवश्यक असणार आहे. तसेच काही कारणामुळे परीक्षेला उपस्थित न राहू शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 19 आणि 20 मार्चला घेतली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”